पाठ सारांश
वृत्ती प्रभाकर विवरण
.... ह.भ.प मुरलीधर धूत महाराज लिखित
ह.भ.प श्री सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान पिठाधिश
||श्री.रामगिरी महाराजाचां शुभ संदेश ||
साधू निक्षलदासजी कृत व्रती प्रभाकर हा ग्रंथ न्यायघटीत वेदोपनिषदीय –सैभ्दान्तिक भूमिकेचा असून साधू निक्षलदाजी हे वेदान्त व न्याय –संख्यादि शास्र पारंगत आदिव्तीय ब्रम्हनिष्ट विद्वान होते.त्यांच्या ह्या ग्रंथाने
वेदान्त शास्त्राची विलक्षनता स्पष्ट रितीने कळून येते अद्वैत –सिद्धांत विषयक संशयाचा पूर्णत छेद होतो.म्हणून हा ग्रंथ मुमुक्षुस अत्यंत उपयुक्त आहे.
या ग्रंथाच्या चिंतनाने संस्कृत –प्राकृत वचनांची तर्कशुद्ध –सुमधुर समन्वयाची दृष्टी लाभते व वेदांतातील रहस्याचे अचूक ज्ञान होते .असा ग्रंथ क्षेत्रीय ब्रम्हनिष्ट सद्गुरूंच्या मुखारविंदातून श्रवण केल्याने पूर्ण बोध होतो.
श्रवण तु गुरो: पूर्ण मननं तद्नंतरम् |
निदिध्यासन मित्येतत्पूर्ण बोधस्य कारनम् ||
अशा पद्धतिने ब्रम्हलीन गुरुवर्य वेदान्त मर्मज्ञ श्री रंगनाथ महाराज (गुरुजी) परभणीकर यांच्या सुमधुर वाणी द्वारा श्रवण केलेले विवरण ह.भ.प.मुरलीधर महाराज धूत यांनी महात्य्प्रयासाने व्रतीप्रभाकार विवरण हा ग्रंथ आपणासमोर प्रस्तुत केलेला आहे.याचा मुमुक्षस चांगल्या प्रकारे लाभ होईल असा माझा आत्मविश्वास आहे.
हाच शुभ संदेश
रामगिरीजी महाराज
सद्गुरु गंगागिरी महाराज
संस्थान श्री क्षेत्र सराला बेट