गोशाळा

गाय अन तिच वासरु... हे नातं आई-बाळाच्या नात्याप्रमाणेच असतं. लहानपणापासूनच बाळाला हम्बा हम्बा.. असं म्हणत गायीची ओळख करून देण्यात येते. गायीच्या दुधाचा, गोमुत्राचा, शेणाचा वापर देखील दैनंदिन जीवनात केला जातो. गो-मूत्र एक उत्तम औषधी असल्याचेही अनेक संशोधनांतून असे सिद्ध झाले आहे. गोमूत्रामधे कार्यरत असणार्या कर्करोग प्रतिबंधक गुणांमुळे देखील पेटंट घेण्यात आले आहे. तर गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांना यूएसएसने अँटी कॅन्सर, अँटी ऑक्सडंट आणि जन्मताच त्रुटी असलेल्या मुलांसाठी उपयुक्त असलेले असे तीन पेटंट दिले आहेत. यासारखे विविध फायदे असणाऱ्या गायींच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या गोशाळांबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जिव्हाळा निर्माण झाला आहे. या गोशाळा चालविल्या जातात. त्यासाठी अनेक दानशूरांकडून तर आर्थिक मदतही केली जाते.