सप्ताह

गोदावरीच्या कुशीत वसलेले सराला बेट महाराजांच्या अधिपत्याखाली गांगागीरीजी महाराज यांनी सुरु केलेली वारकरी पंथाची अध्यात्मिक परंपरा   दिवसेंदिवस अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती पथावर आहे.  देशाच्या कान्याकोपऱ्यातून लाखोच्या संखेने वारकरी मोठ्या ऊत्साहाने सरला बेटावर दर्शनास येतात.

सप्ताहाची परंपरा सदगरु गंगागीरीजी महाराज यांच्या नतंर महंत हरीगीरीजी महाराज, महंत सोमेश्वरगरी महाराज व महंत गुरुवर्य परमपुज्य नारायणगीरीजी महाराज यांनी अखंडित चालू ठेवली.  ब्रम्हलीन महंत गुरुवर्य परमपुज्य नारायणगीरीजी महाराज यांनी त्यांच्या कालखंडात सप्ताहाची  भव्य दिव्य अशी व्याप्ती वाढविली.  महाराज दिनांक १९ मार्च २००९ रोजी समाधीस्थ झाले.

ब्रम्हलीन महंत गुरुवर्य परमपुज्य नारायणगीरीजी महाराजांच्या नंतर महंत रामगीरीजी महाराज यांनी अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अधिक भव्य दिव्य स्वरुपात पुढे चालवीली आहे.  

मार्च २००९ मधे गुरुवर्य महंत रामगिरी महाराज सरला बेटाचे मठाधिपती झाल्यानंतर त्यांच्या अधिपत्याखाली  १६२ व्या सप्ताहा पासून सुरुवात झाली.  त्यानंतर अवघ्या नऊ (9) वर्षात महाराजांनी अखंड हरिनाम सप्ताहाची व्याप्ती त्यांच्या अमृत वाणीने कीर्तनाच्या प्रवचनाच्या आणि भागवत कथेच्या माध्यमातून केलेल्या कार्यक्रमांतर्गत इतकी भव्य दिव्य वाढविली कि राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक सप्ताहास कोणतेही आमंत्रण न देता स्वयं स्फुर्थीने स्वखर्चाने स्वतःच्या व्यवस्थेवर येत असतात. आणि भजन कीर्तन आणि आमटी भाकरीचा स्वाद घेतात.