साईबाबा व गंगागिरीजी महाराजा विषयी थोडेसे ......

ग्रंथाचे नाव : श्री साई सच्चरित

लेखक:कै.गोविंद रघुनाथ दाभोलकर

श्रीसाई सच्चरित उपोद्धात (बाबांचे एक  लेकरू,हरी सीताराम दीक्षित)

सुप्रसिद्ध गंगागीर  बाबा हि येथे(शिर्डीत) येत असत.महाराज येथे आल्या नंतर जेव्हा गंगागीर येथे प्रथम आले,तेव्हा महाराज दोन  हातात दोन  मातीच्या घागरी विहिरीवरून भरून नेत होते.त्यांना पहिल्या बरोबर गंगागीर  बाबा जवळ असलेल्या गावकरी मंडळीना म्हणाले,

‘‘ ही मूर्ती येथे कधी आली? हे केवळ रत्न आहे यांची योग्यता फार मोठी आहे .गाव चे फार मोठे भाग्य आहे कि हे रत्न तुम्हाला लाभले.’’ नंतर गंगागीर बाबा महाराजाच्या दर्शनास गेले व दोघांच्या मोठ्या प्रेमाच्या गोष्ट झाल्या. (पान नं ७ )

अध्याय ४ था :-पुढे देविदासाची भेट |पडली जानकीदासाची  गांठ | गंगागीराची दृष्टादृष्ट |मिळाले त्रिकुट शिर्डीत ||१७३ || पुढील अध्यायात  देविदास महाराज,जानकीदास महाराज आणी  गंगागिरीमहाराज यांच्या भेटीचे वर्णन आहे.(पान न.५४)

अध्याय ५ आरंभी संत भेट वर्णन ओवी न.२,साईबाबा परिचय ३६ ते ३९, गंगागिरीजी महाराज परमार्थ विषयी वर्णन ६९ ते ७२ (५५ ते ६०)

 

स्वयें बाबांनीं वाहूनि जीवन |केली कैसी बाग निर्माण |

गंगागीरादि संतसंमेलन |कथा विंदान पावन तें || २||

तैसेच एक गंगागीर| महाप्रसिध्द वैष्णववीर |

संन्यासाश्रमी सरालेकर | शिरडीस वरचेवर आगमन ||३६ ||

आरंभी साई विहिरीवरी | उभय हस्तीं मातीच्या घागरी |

पाणी वाही  हें देखोनि | आश्चर्य करीत गंगागीर ||३७ ||

ऐसी ही साईची दृष्टादृष्ट | होतांचि बुवा वदले तैं स्पष्ट |

धन्य शिरडीचें भाग्य वरिष्ठ | जोडलें श्रेष्ट हें रत्न ||३८||

हा आज खांदा पाणी वाही | परी ही मूर्ती सामन्य नाहीं |

होतें या भूमीचें पुण्य कांही | तरीच ये ठायी पातली ||३९||

गंगागीरही येचि स्थिति | तालिमबाजीची अती प्रीति |

एकदां खेळत असतां कुस्ती | जाहली उपरती तंयातें ||६९||

प्राप्त काळ घटका आली | एका सिद्धाची वाणी वदली |

“देवासवेंची करीत केली |तनु ही झिजविली पाहिजे ” ||७०||

कुस्ती खेळतां खेळतां कानीं | पडली अनुग्रहरूप ही वाणी |

संसारवर ओतुनि पाणी | परमार्थ भजनीं लागले ||७१||

पुणतांब्याचिया निकटीं | नदीच्या उभय प्रवाहा पोटी  |

आहे बुवांचा मठ त्या बेटीं | सेवेसाठीं शिष्य ही ||

भावार्थ : साईबाबांनी स्वत: घागरीने पाणी वाहून सुंदर अशा प्रकाराची बाग निर्माण केली व सद्गुरु गंगागिरीजी महाराज आदी संत  भेटीची पावन कथा या पाचव्या अध्यायात आहे.

एके प्रसंगी सद्गुरु गंगागिरीजी  महाराज हे शिर्डीत आले असता.त्यांनी साईबाबांना दोन्ही हातात पाण्याच्या घागरी भरून नेताना पहिले त्या वेळी महाराजांना आश्चर्य वाटले.

अशा प्रकारे दोन पुरुषांची नजरा नजर झाली .त्या वेळी सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्पष्ट शब्दात बोलले कि,खरोखरच शिर्डी क्षेत्राचे भाग्य थोर असल्या मुळेच असे महान सत्पुरुषरुपी रत्न लाभले आहे.

महाराज म्हणाले या आज खांद्यावर पाणी वाहत आहे.परंतु हि सामान्य मूर्ती नाही.या भूमीचे काही महान पुण्य असल्यामुळेच बाबा  या ठिकाणी स्थिरावले.

त्याच प्रमाणे इतर अनेक संत महापुरुषांनी सुद्धा साईबाबांच्या बद्दल हे एक महान पुरुष आहे.अशी समाजाला ओळख करून दिली.(शके १७८१ इ.स १८५९ या घटनेचा कालावधी )

याच ग्रंथामध्ये योगीराज सद्गुरुश्री गंगागिरीजी महाराज यांच्या परमार्थिक जीवनाचे वर्णन आले आहे.ते खालील  प्रमाने

महाराजांना कुस्तीचा छंद होता.एका प्रसंगी कुस्ता करीत असताना त्यांना तीव्र वैराग्य निर्माण झाले.योग्य वेळ प्राप्त झाल्यामुळे  एका  सिद्ध महापुरुषांच्या मुखातून त्यांना उद्देश प्राप्त झाला कि या कुसत्या मध्ये शरीर झिजवण्या पेक्षा देवाच्या सेवेतच  शरीर झिजवले  पाहिजे.हे उपदेश रूप वाक्य कानी  पडताच  त्यांनी सर्व संग परित्याग करून परमार्थ करू लागले.अश्या ह्या महान संताचे मठ पुणतांब्याजवळ(१५ कि.मी.) सरला बेट या ठिकाणी आहे.त्यांच्या सेवेत अनेक शिष्य आहे .