नारायणगिरी महाराज

नारायणगिरी महाराजांचा जन्म फाल्गुन शुद्ध ,दशमी शके १८३३ (इ. स. १९११) मध्ये झाला .नारायणगिरी महाराज यांचे नाव बलभीम भानुदास जाधव व मातेचे नाव प्रयागबाई होते. नारायणगिरी महाराज यांनी धर्मिकपणातून आध्यात्मिक अभ्यास केला व नित्यणेमाने उपवास ,गीता पुराण ,भागवत, ज्ञानेश्वरी ,तुकाराम महाराजांचे अभंगाचे वाचन आणि गायन वादन करीत असे.  अशा प्रकारे त्यांच्यामधे सर्वगुणसंपन्न संताचे रूप लोकांना दिसू लागले . श्रीशेत्र पंढरपूर येथे नारायणगिरी महाराज १३ वर्ष वारकरी शिक्षण घेण्यासाठी थांबले . नंतर ते मुलुंड, ठाणे, घाटकोपर येथे कीर्तन प्रवचन करत करत जिल्हा औरंगाबाद (संभाजीनगर )ता. वैजापूरच्या कुशीत असलेले व जिल्हा अहमदनगर ता. श्रीरामपूर मध्ये श्रीक्षेत्र सराला बेटावर आले .

१९४७ साली सराला बेटाचे मठाधिपती सोमेश्वरगिरी महाराज यांनी नारायणगिरी महाराजांना सराला बेटावर विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचा अभ्यासक्रम शिकविण्याकरिता बोलावले व नंतर १९५३ साली त्यांनी सावद्याचे महंत निलगिरी महाराज यांना बोलावून नारायणगिरी महाराजांना दीक्षा देण्याचे ठरविले व त्यांनी दीक्षा घेतली . २८ जुलै १९५७ रोजी सोमेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर सर्वानुमते सराला बेटाचे मठाधिपती म्हणून नारायणगिरी महाराजांची निवड झाली .त्यांचा पहिला अखंड हरिनाम सप्ताह “गोधेगाव ता. कोपरगाव ” या गावी झाला.

नारायणगिरीजी महाराज फाल्गुन वध्य अष्टमी शके १९३० म्हणजेच १९ मार्च २००९ ला समाधिस्त झाले.

महाराज ब्रम्हलीन झाल्यानंतर साधू संत आखाडयाचे कायदेमंडळ यांनी जनता जनार्दन आणि बेटाचे सर्व ट्रस्टी यांच्या उपस्थितीमधे विधिवत सर्वानुमते गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांना सराला बेटाचे मठाधिपती म्हणून ०३ एप्रिल २००९ ला घोषित केले आणि त्याच दिवशी बेटाचे सूत्र त्यांच्या हाती दिले.