साईबाबा परिचय ......

साईबाबांची ओळख करुन देणारे संत गंगागीरीजी महाराज 

  योगीराज सदगुरु गंगागिरीजी महाराज हे एक थोर संत होते .त्यांनी अनेकांच्या जीवनाचे कल्याण केले .अनेकांना सन्मार्गाला लावले. असे सदगुरु योगिराज गंगागिरीजी महाराज होते.  सामान्य मनुष्याला तर सन्मार्गाला लावलेच, अध्यात्मिक शक्तीच्या माध्यमातून भविष्य काळातील साधू संताची ओळख करून देणारे संत म्हणजे योगीराज सदगुरु गंगागिरीजी महाराज होय.

     शिर्डी येथील साईबाबांची जगाला ओळख करून देणारे संत म्हणजे योगीराज सदगुरु गंगागिरीजी महाराज होय .एक वेळेस गंगागिरीजी महाराज व काही भक्त भ्रमन करीत असतना, शिर्डी येथे गेले तेव्हा त्यांना तेथे एक तेजस्वी तेजपुंज युवक दिसला तो युवक मातीच्या घागरीने विहिरीतून पाणी भरत होता.

            || संताचा महिमा संतची जाणती ||

गंगागिरीजी महाराजांनी त्यांना ओळखले आणि शिर्डीतील लोकांना आपल्या तपस्वी योगीराज वाणीतून भविष्यवाणी केली कि हा फार मोठा तपस्वी आहे.

संतार्भ  :-  साई चरित्र अध्याय ५  --  ओव्या ३७ ते ३९

आरंभी साई विहिरीवरी |उभय हस्ती मातीच्या घागरी |

पाणी वाहे हे देखोणी अंतरी |आश्चर्य करी गंगागिरी ||३७ ||

गंगागिरीजी महाराज व साईबाबा यांची दृष्टादृष्ट झाली आणी गंगागिरीजी महाराज यांच्या मुखातून शब्द निघाले हि सर्व सामान्य व्यक्ती नसून शिर्डीच्या भूमी मध्ये पडलेला हा तेजस्वी हिरा आहे.

.|| ऐसी ही साईची दृष्टादृष्ट |होताचि बुवा वदले स्पष्ट |

   धन्य शिर्डीचे भाग्य वरिष्ठ |जोडले श्रेष्ठ हे रत्न ||३८||

  आज हा जरी खांदयावरी पाणी वाहत असला तरी हि सामान्य मूर्ती नाही. उद्याचा तेजस्वी महात्मा आहे.  हे तेजास्वी महात्मा शिर्डीत प्रगटले हे शिर्डीचे आणि येथील लोकांचे मोठे भाग्य आहेत.

  | हा आज खांदा पाणी वाही | परी हि मूर्ती सामान्य नाही |

 |  होते या भूमीचे पुण्य काही |तरी चे ठायी पातली ||३९ ||

     अशी जगाला साईबाबांची ओळख करून देणारे थोर संत योगीराज सदगुरु गंगागिरीजी महाराज होते .